धक्कादायक : आर्थिक अडचणीत आलेल्या अभियंत्याने दिला जीव; अटल सेतूवरून मारली थेट समुद्रात उडी..!

मुंबई : न्यूज कट्टा

मुंबईतील अटल सेतुवरून समुद्रात उडी मारत एका अभियंत्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आर्थिक अडचणी आणि कर्जाच्या बोजामुळे या अभियंत्याने आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, या प्रकरणी न्हावा शेवा पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा नोंद केला आहे.

श्रीनिवास कुरुकुट्टी (वय ३८) असं या आत्महत्या करणाऱ्या अभियंत्याचं नाव आहे. श्रीनिवास हे काही महिन्यांपूर्वीच कुवैतवरून भारतात आले होते. कुवैतमध्ये ते एका खासगी कंपनीत नोकरीला होते. डोंबिवलीत वास्तव्यास असणाऱ्या श्रीनिवास कुरुकुट्टी यांनी भारतात परतल्यानंतर आपला स्वतंत्र व्यवसाय सुरू केला होता. परंतु व्यवसायात म्हणावे असे यश न मिळाल्यामुळे ते तणावात होते.

मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास श्रीनिवास हे आपल्या कारमधून अटल सेतुवर आले. कारमधून बाहेर येत इकडे तिकडे न पाहता त्यांनी थेट खवळलेल्या समुद्रात उडी मारली. श्रीनिवास यांच्या पश्चात पत्नी आणि चार वर्षांची मुलगी आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी आपल्या पत्नी आणि मुलीशी फोनवरून तासभर संवाद साधल्याचेही पोलिस तपासात पुढे आले आहे.

दरम्यान, श्रीनिवास यांनी कुवैतमध्ये असतानाही आत्महत्येचा प्रयत्न केल्याची बाब आता समोर आली आहे. त्यांनी २०२३ मध्ये बाथरूममधील फिनेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. दुसरीकडे श्रीनिवास यांच्या मृतदेहाचा शोध घेण्यात अद्याप यश आलेले नाही. सध्याचं वातावरण आणि खवळलेला समुद्र यामुळे शोधकार्यात अडचणी येत आहेत.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!