धक्कादायक : चायनीज मांजा जीवावर बेततोय; बारामती शहरात चायनीज मांजामुळे सकाळी व्यावसायिक आणि दुपारी युवक गंभीर जखमी..!

बारामती : न्यूज कट्टा

बारामती शहरात चायनीज मांजामूळे एका व्यावसायिकाचा गळा चिरल्याची घटना ताजी असतानाच दुपारी एका युवकाचा चेहरा चिरला गेल्याची घटना घडली आहे. त्यामुळे बारामती शहरात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे बारामती शहर पोलिस ठाण्यासह बारामती नगरपरिषद प्रशासनाकडून चायनीज मांजावर प्रतिबंध घातलाच गेला नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

आज सकाळी बारामती शहरातील एमईएस हायस्कूलजवळ बांधकाम व्यावसायिक अनिल कायगुडे यांचा गळा चायनीज मांजामुळे चिरला गेला. त्यानंतर दुपारी तीन हत्ती चौकात आदित्य उंडे या युवकांच्या चेहऱ्यासह मानेला या चायनीज मांजामूळे गंभीर जखम झाली आहे. सध्या आदित्य उंडे याच्यावर बारामती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सकाळपासून या दोन घटना समोर आल्यानंतर बारामती शहरात मोठ्या प्रमाणात चायनीज मांजा विक्री झाल्याची बाब समोर आली आहे.

पोलिस व नगरपरिषद प्रशासन निद्रिस्त

वास्तविक नागपंचमीपूर्वी चायनीज मांजाची विक्री रोखण्यासाठी पोलिस आणि स्थानिक प्रशासनाकडून कारवाई केली जाते. मात्र बारामती शहर पोलिस ठाणे आणि बारामती नगरपरिषदेने याबाबत कोणतीच पावले उचलली नाहीत हे जवळपास स्पष्ट झाले आहे. शहरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे चायनीज मांजा विकला जात असताना पोलिस यंत्रणा आणि नगरपरिषद प्रशासनाने बघ्याची भूमिका घेतली आहे. काहीच कारवाई होत नसल्यामुळे चायनीज मांजा विक्रेत्यांचे फावले आहे.

नागरिकांचा जीव मुठीत

बारामती शहरात आज सकाळपासून चायनीज मांजामूळे दोघेजण गंभीर जखमी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे आता नांगरीकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे शाळेतून ये-जा करणारे पालक सकाळी आणि दुपारच्या वेळी मोठ्या प्रमाणात असतात. रस्त्यावरून जाताना मांजा तर आडवा येणार नाही ना अशी धास्ती आता नागरिकांना लागली आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!