BIG NEWS : उद्या अजितदादांसह राष्ट्रवादीचे प्रमुख नेते बारामतीत; मिशन हायस्कूल मैदानातील जनसन्मान मेळाव्यात होणार मोठी घोषणा

बारामती : न्यूज कट्टा

बारामतीत उद्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जनसन्मान मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उद्या बारामतीत असणार आहेत. बारामती शहरातील मिशन हायस्कूलच्या मैदानात या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. दरम्यान, या मेळाव्यात कोणती घोषणा होते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

बारामतीत उद्या रविवार दि. १४ जुलै रोजी दुपारी १ वाजता मिशन हायस्कूलच्या मैदानात जनसन्मान मेळावा होत आहे. या मेळाव्याला उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्यासह कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, अनिल पाटील, अदिती तटकरे, धर्मरावबाबा अत्राम, संजय बनसोडे यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

या मेळाव्याच्या निमित्तानं अजितदादा मोठी घोषणा करणार आहेत. ही घोषणा काय याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे. दुसरीकडे या मेळाव्यातून राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे. त्यामुळे उद्या होत असलेल्या या मेळाव्याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या मेळाव्यासाठी मिशन हायस्कूलच्या मैदानावर जय्यत तयारी करण्यात आली असून काही हजार कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित राहतील असा अंदाज आहे.

‘असा’ असेल अजितदादांचा दौरा

उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार हे या मेळाव्याच्या निमित्तानं बारामतीत येत आहेत. सकाळी ८ वाजता ते बारामतीत दाखल होणार आहेत. दुपारी १ वाजेपर्यंतचं वेळापत्रक राखीव ठेवण्यात आले आहे. त्यानंतर १ वाजता अजितदादा मिशन हायस्कूलच्या मैदानावर दाखल होतील. जनसन्मान मेळाव्यानंतर ते सोईनुसार मुंबईकडे रवाना होणार आहेत.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!