BIG BREAKING : प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकरचा आणखी एक उद्योग आला समोर; आतापर्यंत ११ वेळा दिली यूपीएससीची परीक्षा, दोनवेळा नावही बदललं..!

पुणे : न्यूज कट्टा        

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरचे नवनवीन उद्योग समोर येत आहेत. विशेष म्हणजे आता पूजा खेडकरने चक्क केंद्रीय लोकसेवा आयोगाचीच फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. यूपीएससीचे सर्व प्रयत्न संपल्यानंतर पूजाने नाव बदलून परीक्षा दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत पूजाने ११ वेळा परीक्षा दिल्याची बाबही पुढे आली आहे.

मागील काही दिवसांपासून प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर या आपल्या शाही थाटामुळे चर्चेत आल्या आहेत. स्वतंत्र वाहनासह निवास व्यवस्था आणि कार्यालयात स्वतंत्र कक्षासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना धारेवर धरणाऱ्या पूजाचे अनेक उद्योग आता समोर येत आहेत. यामध्ये आता नव्याने भर पडली असून पूजाने केंद्रीय लोकसेवा आयोगाचीच फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे.

पूजा खेडकरने २०२०-२१ पर्यंत खेडकर पूजा दिलीपराव या नावाने परीक्षा दिल्या. त्यानंतर २०२१-२२ मध्ये आपल्या नावात बदल करून परीक्षा दिल्याची बाब समोर आली आहे. यूपीएससीच्या परीक्षेचे प्रयत्न संपल्यानंतर पूजा मनोरमा दिलीप खेडकर असं नाव बदलून दोनवेळा परीक्षा दिली आहे. यूपीएससीच्या नियमानुसार ओबीसी प्रवर्गातील उमेदवाराला नऊवेळा परीक्षा देता येते. मात्र पूजा खेडकरने नावात बदल करून तब्बल ११ वेळा परीक्षा दिली आहे.

शाही थाटात वागू पाहणाऱ्या पूजा खेडकरने थेट केंद्रीय लोकसेवा आयोगालाच फसवल्याचं आता पुढे आलं आहे. त्यामुळे पूजा खेडकरच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होणार आहे. एकीकडे पूजा खेडकरच्या दिव्यांग व मानसिक आजाराबद्दलच्या प्रमाणपत्रांबद्दल संशय व्यक्त होत असतानाच आता नावात बदल केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे आता पूजा खेडकरचे पाय आणखी खोलात गेले आहेत.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!