BIG NEWS : अजितदादा अन् देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर भरकटलं; किस्सा सांगत अजितदादा म्हणाले, माझ्या तर पोटातच गोळा आला..!

गडचिरोली : न्यूज कट्टा

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या खास शैलीतील भाषणांसाठी प्रसिद्ध आहेत. हलकेफुलके किस्से सांगत श्रोत्यांच्या टाळ्या मिळवण्यात त्यांचा हातखंडा आहे. आज अजितदादा गडचिरोली येथे आयोजित एका कार्यक्रमासाठी उपस्थित होते. यावेळी त्यांनी नागपूरहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत येताना हेलिकॉप्टर भरकटल्याचा किस्सा सांगितला. हेलिकॉप्टर भरकटलं आणि माझ्या तर पोटातच गोळा आला, पण आम्ही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे सुखरूप पोहोचलो असंही सांगायला ते विसरले नाहीत.

गडचिरोली जिल्ह्यातील वडलापेठ येथील सुरजागड इस्पात प्रा.लि. या आयरन स्पोंज निर्मिती करणाऱ्या कारखान्याचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला. या कार्यक्रमासाठी अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस हे एकाच हेलिकॉप्टरमधून गडचिरोलीत आले. नागपूरमधून ते हेलिकॉप्टरने कार्यक्रमस्थळी आले. मात्र तत्पूर्वी काही वेळ हेलिकॉप्टर भरकटलं होतं. याचाच किस्सा अजितदादांनी आपल्या खास शैलीत सांगितला.

आजच्या या कार्यक्रमासाठी आम्ही हेलिकॉप्टरने येत होतो. नागपूरमधून हेलिकॉप्टरमध्ये बसल्यानंतर काहीच वाटलं नाही. मात्र गडचिरोलीजवळ आल्यानंतर हेलिकॉप्टर ढगात शिरलं अन् माझ्या पोटात गोळा आला. एकतर आज एकादशी.. मी मनातल्या मनात पांडुरंगा, पांडुरंगा असं म्हणत होतो. मी इकडे-तिकडे पाहतोय तर ढगच दिसत होते. हे सगळं होत असताना देवेंद्र फडणवीस मात्र निवांत बसून होते.

मी त्यांना म्हणालो, आपण ढगातून जात आहोत. त्यावर फडणवीस म्हणाले, घाबरू नका. माझे आजवर सहा अपघात झाले आहेत, पण मला काहीच झाले नाही. मी हेलिकॉप्टरमध्ये असल्यावर मला कधीच काही होत नाही. ते बोलले आणि झालंही तसंच. माझ्या शेजारी बसलेले उदय सामंत म्हणाले, दादा बघा जमीन दिसते खाली.. अन् आम्ही सुखरूप या ठिकाणी पोहोचलो.. असं सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. त्यावर त्यांच्या पूर्वजांची पुण्याई आहे, त्यामुळे महाराज इथवर पोहोचलेत असं म्हणत कोटी केली.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!