PUNE BREAKING : पुण्यात आणखी एक हिट अँड रनची घटना; नांदेड सिटी परिसरात चारचाकीची एका दुचाकीसह अन्य वाहनांना धडक

धायरी : न्यूज कट्टा

पुण्यात आणखी एक हिट अँड रनची घटना समोर आली आहे. एका चारचाकीने समोरील दुचाकीसह अन्य दोन ते तीन वाहनांना धडक दिल्याचा प्रकार घडला आहे. यामध्ये एक महिला गंभीर जखमी झाली आहे. नांदेड सिटीमधील डीसी मॉलजवळ आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, संबंधित चालकाला पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.

संतोष शिवाजी गायकवाड (रा. धायरी, पुणे) असं या चालकाचं नाव आहे. याबाबत माहिती अशी की, संतोष गायकवाड हे शिक्षक असून आज सकाळी ते आपल्या चारचाकी वाहनाने मावळ तालुक्यात असलेल्या शाळेकडे जात होते. नांदेड सिटीतील डीसी मॉलजवळ गायकवाड यांचा आपल्या कारवरील ताबा सुटल्याने समोरच असलेल्या दुचाकीला धडक बसली. त्यानंतर आणखी दोन ते तीन वाहनांना जोराची धडक दिली.

या घटनेत दुचाकीवरील महिला गंभीर जखमी झाली आहे. तिला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेनंतर संतप्त जमावाने संतोष गायकवाड यांना बेदम मारहाण केली. या घटनेनंतर हवेली पोलिसांनी संतोष गायकवाड यास ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!