BARAMATI BREAKING : अर्धनग्न करून महिलेची लूट; बारामती तालुका पोलिसांकडून संशयित आरोपीचं रेखाचित्र जारी

बारामती : न्यूज कट्टा  

बारामती शहरानजीक वंजारवाडी येथे पायी चालण्याचा व्यायाम करणाऱ्या महिलेला चाकूचा धाक दाखवून तिच्याकडील दागिने लुटत अर्धनग्न फोटो काढल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी घडला होता. या प्रकरणी तीन अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून बारामती तालुका पोलिसांकडून आता एका संशयित आरोपीचे रेखाचित्र जारी करण्यात आले आहे.

बुधवारी सायंकाळी वंजारवाडी येथे वास्तव्यास असलेली विवाहिता आपल्या आईकडे गेली होती. तेथून पुन्हा रुईच्या दिशेने वंजारवाडी येथील पालखी मार्ग चौकात पायी चालत असताना ही विवाहिता जवळच असलेल्या शेतात लघुशंकेसाठी गेली होती. त्यावेळी त्या ठिकाणी या विवाहितेच्या गळ्याला चाकू लावत अज्ञात तीन इसमांनी तिच्याकडील १ लाख ५ हजार रुपये किमतीचे दागिने हिसकावून घेतले. तसेच तिला कपडे उतरवण्यास सांगून अर्धनग्न फोटो काढत पोबारा केला होता.

या प्रकरणी संबंधित विवाहीतेच्या फिर्यादीनंतर बारामती तालुका पोलिस ठाण्यात तीन अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल केला आहे.  दरम्यान, या घटनेनंतर बारामतीत खळबळ उडाली असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत या प्रकरणाचा तपास पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली असून संबंधित विवाहितेने दिलेल्या वर्णनावरून यातील संशयित आरोपीचे रेखाचित्र तयार करण्यात आले आहे.

संशयित आरोपीचे रेखाचित्र पोलिसांकडून प्रसिद्ध करण्यात आले असून या वर्णनाचा इसम आढळल्यास पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर मो. ९८२३२१४५००, सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश लंगूटे मो. ९६२३२७८९१५, पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय लेंडवे मो. ९८५०८८१६२२, हे. कॉ. राम कानगुडे मो. ७९७२५१७१७४ आणि पो. कॉ. स्वप्नील अहिवळे मो. ८८०५०२९१३८ यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!