CRIME BREAKING : खामगावमध्ये भरदिवसा कोयत्याने वार करत तरुणाचा खून; दौंड तालुक्यात उडाली खळबळ  

दौंड : न्यूज कट्टा 

दौंड तालुक्यातील खामगाव येथे भरदिवसा एका युवकावर कोयत्याने वार करत त्याचा खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर दौंड तालुक्यात एकच खळबळ उडाली असून नागरीकांमधून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, या घटनेचा थरार सीसीटिव्हीत कैद झाला असून यवत पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. 

सुरज राहुल भुजबळ असं या घटनेत हत्या झालेल्या युवकाचं नाव आहे. सुरज हा खामगावमधील चौकात असलेल्या आपल्या कापड दुकानात बसला होता. एकजण हातात कोयता घेवून दुकानात घुसला आणि काही समजण्याआधीच त्यानं हातातील कोयत्याने सुरजवर वार करायला सुरुवात केली. त्यामध्ये सुरज जागीच कोसळला. 

या घटनेची माहिती समजल्यानंतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. या भयंकर घटनेनंतर ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त करत आरोपीच्या अटकेची मागणी केली. यवत पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत ग्रामस्थ व नातेवाईकांची समजूत काढत आरोपी लवकरात लवकर पकडू असं आश्वासन दिलं. 

दरम्यान, या घटनेचा संपूर्ण थरार सीसीटिव्हीत कैद झाला असून नात्यातीलच व्यक्तीने हा खून केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या प्रकरणी अधिक तपास यवत पोलिस करत आहेत. 

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!