BIG BREAKING : दूधात भेसळ करणं पडणार महागात, ‘मोक्का’ कायद्यांतर्गत होणार कारवाई; लवकरच अध्यादेश निघणार : अजितदादांनी दिली माहिती

BIG BREAKING : दूधात भेसळ करणं पडणार महागात, ‘मोक्का’ कायद्यांतर्गत होणार कारवाई; लवकरच अध्यादेश निघणार : अजितदादांनी दिली माहिती

बारामती : न्यूज कट्टा

मागील काही काळात कॅन्सर रुग्णांचं प्रमाण वाढलं आहे. यामध्ये दूधात होणाऱ्या भेसळीमुळेही अनेकांना कॅन्सरसारख्या आजाराला तोंड द्यावं लागत आहे. या पार्श्वभूमीवर दूधात भेसळ करणाऱ्यांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार आहे. याबाबतचा अध्यादेश लवकरच निघणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान दिली.

विविध प्रकल्पांच्या माध्यमातून उपलब्ध होणारं दूध ही सामान्य कुटुंबातील मुलं पित असतात. मात्र दूधातील भेसळीमुळे अनेकांना आरोग्याच्या समस्या भेडसावतात. त्यामध्ये कॅन्सरसारखे आजारही बळावतात असं निदर्शनास आलं आहे. त्यामुळेच महायुती सरकारने दूधात भेसळ करणाऱ्यांवर आता मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. याबाबत लवकरच अध्यादेश काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मागील काळात दूधात भेसळ करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी असा प्रस्ताव आम्ही दिला होता. मात्र राष्ट्रपतींकडून त्याला मान्यता मिळाली नाही. त्यामुळे आता दूध भेसळ रोखण्यासाठी कडक पावले उचलली जात असून दूध भेसळ केल्यास मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!