BIG BREAKING : अजितदादांकडून पदाधिकारी बदलाचे संकेत;  बारामती शहर व तालुक्यातील राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांना राजीनामा देण्याचा आदेश..!

बारामती : न्यूज कट्टा

लोकसभा निवडणुकीत जो निकाल लागला त्याबद्दल आत्मचिंतन करतानाच आपण का कमी पडलो याचाही विचार केला पाहिजे. त्यामुळे आता नविन लोकांनाही आपण संधी दिली पाहिजे. त्यासाठी बारामती शहर आणि तालुक्यातील सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे द्यावेत असे आदेश देत येत्या काही दिवसात आपण नवीन लोकांना संधी देणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

बारामतीत आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. या मेळाव्याला संबोधित करताना अजितदादांनी बारामती शहर व तालुक्यातील सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत.

लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी मी स्वत: घेतली आहे. यात कुणाला दोष देण्याचा प्रश्नच येत नाही. परंतु आपण का कमी पडलो याचाही विचार करणं आवश्यक आहे. आपण कमी पडत असताना इतरांना संधी देण्याबद्दलही विचार झाला पाहिजे. त्यासाठीच बारामती शहर आणि तालुक्यातील सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे द्यावेत. येत्या काही दिवसात आपण त्या त्या पदावर नविन लोकांना संधी देणार आहोत असं अजितदादांनी यावेळी स्पष्ट केलं.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!