बारामती : न्यूज कट्टा
श्री क्षेत्र सोमेश्वर येथील श्रावणी यात्रेनिमित्त बारामती तालुक्यातील चौधरवाडी येथे उद्या शनिवार दि. १० ऑगस्ट रोजी ‘सौ. सुनेत्रा अजितदादा पवार खासदार केसरी’ या बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे. या मैदानात राज्यातील नामवंत बैलगाडी जोडींनी सहभाग नोंदवला असून शौकिनांना शर्यतींचा थरार अनुभवण्यास मिळणार आहे.
सध्या श्रावण महिना सुरू असून श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिरात श्रावणी यात्रा होत आहे. या पार्श्वभूमीवर संग्राम सोरटे आणि ऋषि गायकवाड मित्रमंडळाने ‘सौ. सुनेत्रा अजितदादा पवार खासदार केसरी’ बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये खासदार केसरी ठरणाऱ्या पहिल्या बैलगाड्याला १ लाख रुपये, द्वितीय क्रमांकास ७५ हजार, तृतीय बक्षीस ५१ हजार, चौथे बक्षीस ३१ हजार, पाचवे बक्षीस २१ हजार, सहावी बक्षीस १५ हजार, सातवे बक्षीस ११ हजार आणि आठवे बक्षीस १० हजार रुपये दिले जाणार आहे.
तसेच प्रत्येक नंबरसाठी २ ढाली सन्मानचिन्ह म्हणून दिल्या जाणार आहेत. या बैलगाडा शर्यतीत राज्यातील नामवंत बैलगाडा जोडींनी नावनोंदणी केली आहे. या मैदानास अधिकाधिक शौकिनांनी उपस्थित राहून शर्यतींचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.





