BIG BREAKING : पुण्यात दहशतवाद्यांकडून बॉम्बस्फोटाची शक्यता; पुण्याच्या पोलिस आयुक्तांच्या पत्रामुळे उडाली खळबळ

पुणे : न्यूज कट्टा   

गेल्या काही दिवसांत पुणे शहर आणि परिसरात दहशतवादी संघटनांशी संबंधित व्यक्तींवर पुणे पोलिसांकडून कारवाया करण्यात आल्या आहेत. अशातच आता पुण्यातील एका नामांकित हॉटेलला दहशतवादी टार्गेट करू शकतात अशी शक्यता स्वत: पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनीच व्यक्त केली आहे. त्यांनी याबाबत संबंधित हॉटेलला पत्र लिहीत संभाव्य धोक्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

पुण्यातील कल्याणीनगर परिसरात असलेल्या हॉटेलला पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सहीने हे पत्र पाठवण्यात आले आहे. सतत वर्दळ असलेल्या या हॉटेलमध्ये दहशतवाद्यांकडून बॉम्बस्फोटासारखी घटना घडवून आणली जाऊ शकते. त्यातून मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही असा आशय या पत्रात नमूद करण्यात आला आहे.

संबंधित हॉटेल परिसरात सतत गर्दी असते. त्यामुळे पुणे पोलिसांकडून सातत्याने हॉटेल व्यवस्थापनाला नोटीस बजावण्यात आली आहे. या हॉटेलमधील डिस्कोथेक रद्द करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस देण्यात आली असून त्यामध्ये सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. या हॉटेलमध्ये लोक दारू पिऊन धिंगाणा घालतात. सध्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्रच अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यामुळे एखादी अतिरेकी संघटना गर्दीचे ठिकाण लक्ष्य करू शकते असं पत्रात म्हटलं आहे.

या पत्रानुसार संबंधित हॉटेल परिसरात बॉम्बस्फोटासारखी दुर्घटना घडवली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, या हॉटेलकडून सातत्याने नियमांचे उल्लंघन केले जात आहे. येथील डिस्कोथेकमुळे आजूबाजूला वास्तव्यास असलेल्या नागरिकांना त्रास सोसावा लागतो. या हॉटेलवर यापूर्वीही गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. या हॉटेलमध्ये कोणतीही चोख सुरक्षा व्यवस्था नाही.

एखादी दुर्दैवी घटना घडल्यास त्या पद्धतीचं नियोजनही नाही असं म्हणत थेट हॉटेलच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न निर्माण करण्यात आला आहे. या हॉटेलकडून सातत्याने नियम व कायदे मोडले जातात असं म्हणत संभाव्य धोक्याचा इशारा या पत्राद्वारे देण्यात आला आहे. स्वत: पोलिस आयुक्तांनीच दहशतवादी हल्ल्याचा इशारा दिल्यामुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पोलिस यंत्रणेकडून ठोस पावले उचलली जाण्याची शक्यता आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!