बारामती : न्यूज कट्टा
बारामती शहरातील भिगवण रस्त्यावर एका टोयाटो कंपनीच्या चारचाकीला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. या कारच्या वायरींगमधील दोषामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत असून आगीच्या या घटनेनंतर बारामती शहरातील भिगवण रस्त्यावर वाहतुक खोळंबली आहे.
बारामती शहरातील रिंगरोडकडे जाणाऱ्या चौकात एका चारचाकी वाहनाला अचानक आग लागली. आगीच्या या घटनेनंतर प्रचंड खळबळ उडाली असून ही कार जिथे थांबवली होती त्या ठिकाणी कपड्यांचं शोरुम तर बाजूलाच हॉटेलही आहे.
या घटनेनंतर भिगवण रस्त्यावरील वाहतुक मोठ्या प्रमाणात खोळंबली असून लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. दरम्यान, घटनास्थळी अग्निशमन दलासह पोलिस यंत्रणा बोलवण्यात आली आहे.
Post Views: 4,310





