BLOOD DONATION : बारामतीत येत्या शुक्रवारी रक्तदान शिबिराचे आयोजन; हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त उपक्रम

बारामती : न्यूज कट्टा

मुस्लिम समाजाचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त बारामतीत येत्या शुक्रवारी दि. २० सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिरात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलं आहे.

प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीचे औचित्य साधून बारामतीत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. वायफळ खर्च न करता समाजातील वंचित घटकांना तसेच गरजूंना फायदा होईल अशा उपक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले आहे. त्यामध्ये बारामतीतील मुस्लिम समाजाच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

बारामती शहरातील हजरत चाँदशाहवली बाबा दर्गा मशिदीच्या आवारात शुक्रवारी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत हे शिबिर होणार आहे. या शिबिरामध्ये संकलित होणारं रक्त गरजू रुग्णांना, तसेच प्रसूती झालेल्या महिलांसाठी निशुल्क उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच रक्तदात्यांना आवश्यकता भासल्यास त्यांनाही मोफत रक्त उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच रक्तदात्याशी संबंधित नातेवाईकांना अल्प दरात रक्त उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

अलीकडील काळात विविध रुग्णांना सातत्याने रक्ताची आवश्यकता भासते. मात्र अनेकजण आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे रक्ताची गरज भागवू शकत नाहीत. या पार्श्वभूमीवर या शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, यात संकलित होणारे रक्त मोफत गरजू रुग्णांना देण्याचा निर्णयही आयोजकांनी घेतला आहे. त्यामुळे अधिकाधिक रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी व्हावं असं आवाहन आयोजकांनी केलं आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!