SHOCKING : वडगाव शेरीत मिरवणुकीत झेंड्याचा पाईप वीजवाहक तारेला चिकटला; शॉक बसून दोन युवकांचा मृत्यू

पुणे : न्यूज कट्टा

पैगंबर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवेळी झेंड्याचा पाईप वीजवाहक तारेला चिकटल्यामुळे शॉक बसून दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यातील वडगाव शेरी भागात घडली. या घटनेत दोन निष्पाप युवकांचा बळी गेल्यानं हळहळ व्यक्त होत असून आज दिवसभरात या भागात आयोजित केलेले सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

अभय अमोल वाघमारे( वय १७, रा. वाडेश्वरनगर, वडगावशेरी) आणि जकरिया बिलाल शेख (वय १९, रा. इनामदार शाळा,  वडगावशेरी) अशी या घटनेत मृत पावलेल्या युवकांची नावे आहेत. आज सकाळी वडगाव शेरी गावठाणात मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त मुस्लिम समाजाच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये साऊंड सिस्टीम ठेवण्यात आलेली होती. या स्पीकरवर उभे राहून काही युवक झेंडा फडकवत होते.

भाजी मंडईपासून वडगाव शेरी गावठाणाकडे जाताना अभय वाघमारे याच्या हातातील झेंड्याचा पाईप वीजवाहक तारेला लागला.  त्यामुळे विजेचा जोरदार धक्का बसून अभय हा जागेवरच कोसळला. शेजारीच उभ्या असलेल्या जकरीया शेख यालाही वीजेचा धक्का बसला. त्याला उपचारासाठी जवळच असलेल्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याचंही निधन झालं. या घटनेनंतर वडगाव शेरी परिसरात हळहळ व्यक्त होत असून दिवसभरात आयोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

 

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!