बारामती : न्यूज कट्टा
बारामती शहरातील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या आवारात एका युवकाचा कोयता आणि चाकूने वार करत खून करण्यात आला आहे. जुन्या वादाच्या रागातून दोघांनी या युवकाचा खून केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून अन्य एकजण फरार आहे. दरम्यान, या घटनेनंतर बारामतीत खळबळ उडाली आहे.
अथर्व पोळ (वय १८) असं हत्या झालेल्या महाविद्यालयीन युवकाचं नाव असून तो तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातच शिकत होता. काही दिवसांपूर्वी त्याचा आपल्याच मित्रांशी गाडी पार्किंगला लावण्यावरून वाद झाला होता. त्यातूनच आज सकाळी अथर्वचा त्याच्याच दोन मित्रांनी कोयता आणि चाकूने वार करत खून केला. अत्यंत थंड डोक्याने हा खून करण्यात आला असून अथर्वच्या गळ्यात अक्षरश: चाकू अडकला होता असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.
विशेष म्हणजे, महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावरच ही थरारक घटना घडली आहे. त्यामुळे महाविद्यालयीन युवकांमध्ये ही धाडस येतं कुठून असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होऊ लागला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून एक आरोपी फरार झाला आहे. या घटनेनंतर बारामतीत खळबळ उडाली आहे.





