BARAMATI APMC : अजितदादांनी शब्द दिला आणि पूर्णही केला; झारगडवाडीत बाजार समितीच्या उपबाजारासाठी शासकीय जमिन देण्यास राज्य शासनाकडून मान्यता

बारामती : न्यूज कट्टा

बारामती कृषि उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथे नवीन उपबाजार उभारण्याचा मानस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला होता. त्यानुसार या उपबाजारासाठी झारगडवाडी येथील २१ एकर शासकीय जमीन देण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या उपबाजारामुळे झारगडवाडी गावाच्या वैभवात भर पडणार असून विविध व्यवसायांना चालना मिळणार आहे.

बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथे बारामती बाजार समितीचा उपबाजार सुरू करण्याचा मानस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलून दाखवला होता. त्यानुसार येथील २१ एकर शासकीय जागेसाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. या प्रस्तावाला नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली असून उपबाजारासाठी २१ एकर जागा मोफत देण्यास मंजूरी देण्यात आली आहे.

या उपबाजारामुळे झारगडवाडी गावाच्या वैभवात भर पडणार आहे. त्याचबरोबर विविध व्यवसायांना चालना मिळून आर्थिक उलाढाल वाढणार आहे. त्याचबरोबर या उपबाजाराच्या निमित्तानं अधिकच्या सोईसुविधाही उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी या निर्णयाचं स्वागत करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहे. अजितदादांनी शब्द दिला आणि तो पूर्ण करून दाखवला अशी प्रतिक्रिया येथील ग्रामस्थांनी दिली आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!