मुंबई : न्यूज कट्टा
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते बाबा सिद्धीकी यांच्यावर आज रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाला. यामध्ये बाबा सिद्धीकी यांचा मृत्यू झाला आहे. या गोळीबारात बाबा सिद्धीकी यांच्या छातीवर गोळी लागली होती. नुकताच त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. काल अभिनेते सयाजी शिंदे यांच्या पक्ष प्रवेशावेळीही ते उपस्थित होते.
आज रात्री ९ वाजण्याच्या सुमारास बाबा सिद्धीकी यांच्यावर गोळीबार झाला. बांद्रा परिसरातील निर्मलनगर येथे एका कार्यक्रमावेळी फटाक्यांची आतिषबाजी सुरू होती. त्यावेळीच बाबा सिद्धीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यांच्यावर तीन राऊंड फायर करण्यात आले. त्यामध्ये सिद्धीकी यांच्या छातीवर एक गोळी लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
गंभीर जखमी झालेल्या बाबा सिद्धीकी यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात नेण्यात आले होते. परंतु तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आलं. सिद्धीकी यांनी नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. बॉलीवूडमध्येही त्यांचा विशेष प्रभाव होता. आमदार झिशान सिद्धीकी हे त्यांचे पुत्र आहेत.





