BIG NEWS : बारामतीतून अजितदादांची उमेदवारी जाहीर; राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत ३८ उमेदवारांची घोषणा

मुंबई : न्यूज कट्टा  

महायुतीतील भाजप आणि शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी ३८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये बारामती विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रवादीच्या विद्यमान मंत्र्यांची उमेदवारीही आज जाहीर करण्यात आली.

आज मुंबईतील राष्ट्रवादी कॉँग्रेस प्रदेश कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीच्या ३८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीतील चर्चेनंतर आज काही जागांवरील उमेदवार घोषित करीत असल्याचं सुनील तटकरे यांनी सांगितलं. दुसरी यादीही लवकरच जाहीर केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, आज जाहीर करण्यात आलेल्या यादीत उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कृषीमंत्री धनंजय मुंडे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आदिवासी विकास मंत्री धर्मराव बाबा अत्राम, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ या मंत्र्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत ३८ उमेदवार जाहीर

बारामती – अजित पवार

येवला – छगन भुजबळ

आंबेगाव – दिलीप वळसे-पाटील

कागल – हसन मुश्रीफ

परळी – धनंजय मुंडे

दिंडोरी – नरहरी झिरवाळ

अहेरी – धर्मराव बाबा अत्राम

श्रीवर्धन – आदिती तटकरे

अंमळनेर – अनिल भाईदास पाटील

उदगीर – संजय बनसोडे

अर्जुनी मोरगाव – राजकुमार बडोले

माजलगाव – प्रकाश दादा सोळंके

वाई – मकरंद पाटील

सिन्नर – माणिकराव कोकाटे

खेड आळंदी – दिलीप मोहिते

अहमदनगर शहर – संग्राम जगताप

इंदापूर – दत्तात्रय भरणे

अहमदपूर – बाबासाहेब पाटील

शहापूर – दौलत दरोडा

पिंपरी – अण्णा बनसोडे

कळवण – नितीन पवार

कोपरगाव – आशुतोष काळे

अकोले- किरण लहामटे

वसमत – चंद्रकांत उर्फ राजू नवघरे

चिपळून – शेखर निकम

मावळ – सुनिल शेळके

जुन्नर – अतुल बेनके

मोहेळ – यशवंत विठ्ठल माने

हडपसर – चेतन तुपे

देवळाली – सरोज आहिरे

चंदगड – राजेश पाटील

इगतपुरी – हिरामण खोसकर

तुमसर – राजू कारेमोरे,

पुसद – इंद्रनील नाईक

अमरावती शहर – सुलभा खोडके

नवापूर – भरत गावित

पाथरी – निर्मला विटेकर

मुंब्रा-कळवा – नजीब मुल्ला

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!