बारामती : न्यूज कट्टा
राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी सहाव्यांदा निवड झाल्याबद्दल अजितदादा पवार यांचा उद्या रविवार दि. २२ डिसेंबर रोजी बारामतीकरांच्या वतीने नागरी सत्कार आयोजित करण्यात आला आहे. तत्पूर्वी सकाळी ६ वाजल्यापासून अजितदादा आपल्या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. विकासकामांच्या पाहणीसह बारामतीत आयोजित विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत.
उद्या दुपारी ४ वाजता बारामती शहरातील शारदा प्रांगणामध्ये अजितदादांचा नागरी सत्कार होणार आहे. या कार्यक्रमाला खासदार सुनेत्रा पवार, आमदार अमोल मिटकरी यांची उपस्थिती असणार आहे. दरम्यान, अधिवेशनानंतर अजितदादा प्रथमच बारामतीच्या दौऱ्यावर येत आहेत. नेहमीप्रमाणे सकाळी ६ वाजता त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे.
अजितदादा बारामती शहर आणि परिसरातील विविध विकासकामांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सकाळी ९ वाजता अष्टविनायक ज्वेलर्स या सुवर्णपेढीचं उदघाटन अजितदादांच्या हस्ते होईल. त्यानंतर रुई येथीलच स्वयंभू हॉस्पिटल व माऊली मेडीकलचे उदघाटन होणार आहे. सकाळी साडेअकरा वाजता मोरोपंत सभागृहात कारभारी अण्णा चॅरीटेबल ट्रस्टने आयोजित केलेल्या शिबिराचं उदघाटन अजितदादांच्या हस्ते होईल.





