नवी दिल्ली : न्यूज कट्टा
भारताचे माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचं आज वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्यांचं निधन झाल्याचं जाहिर करण्यात आलं.
मनमोहन सिंग यांची प्रकृती खालवल्यामुळे आज सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर अनेक मान्यवरांनी दु:ख व्यक्त केलं.. देशाला आर्थिक मंदितून बाहेर काढणारं व्यक्तिमत्व गमावल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.
Post Views: 540





