PUNE CRIME : अंगात देव येतो म्हणत घरात घुसला.. चाकूचा धाक दाखवत महिलेवर अत्याचार केला; पुण्यातील खळबळजनक घटना

पुणे : न्यूज कट्टा  

माझ्या अंगात देव येतो असं सांगून चाकूचा धाक दाखवत घरात घुसून एका महिलेवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना पुण्यात घडली आहे. या घटनेनंतर बिबवेवाडी पोलिस ठाण्यात बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, संबंधित तक्रारदार महिला आणि आरोपी हे एकमेकांना ओळखत होते. या दरम्यान, आरोपीने तक्रारदार महिलेच्या घरी येवून आपल्या अंगात देव येतो, मी काहीही करू शकतो असं सांगत या महिलेला प्रभावित करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हा इसम वेळोवेळी या महिलेच्या घरी जाऊन तिच्याशी जवळीक वाढवू लागला.

नंतरच्या काळात त्याने या महिलेच्या घरी मुक्कामाला येणं सुरू केलं. अशातच ही महिला आपल्या दोन मुलांसोबत एकटी असताना आरोपी त्यांच्या बेडरूममध्ये गेला. त्या ठिकाणी त्यानं चाकूचा धाक दाखवत संबंधित महिलेसह मुलांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि या महिलेवर बलात्कार केला असं फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे. यावरुन बिबवेवाडी पोलिसांनी बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी संबंधित इसमावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास बिबवेवाडी पोलिस करत आहेत.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!