CRIME BREAKING : कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्येचा बदला घेण्याचा कट उधळला; वर्ष पूर्ण होण्याआधीच ‘गेम’ वाजवण्याचा होता प्लॅन

पुणे : न्यूज कट्टा

कुख्यात गुंड शरद मोहोळ याची कोथरूड परिसरातील सुतारदरा भागात ५ जानेवारी २०२४ रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेला येत्या रविवारी एक वर्ष पूर्ण होत आहे. अशातच आता या हत्येचा बदला घेण्याचा प्लॅन आखण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शरद मोहोळच्या हत्येचा बदला घेण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना अटक करत हा कट उधळून लावला आहे.

शरद मालपोटे आणि संदेश कडू अशी पुणे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांकडून दोन पिस्तूलह जप्त करण्यात आले आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने ही कारवाई केली. याबाबत मिळालेली माहिती अशी की, शरद मोहोळ याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी शरद मालपोटे आणि संदेश कडू हे संधी शोधत होते. त्यासाठी दोघांनी पिस्तूलही आणले होते. याबाबतची माहिती पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचत दोघांना अटक केली आहे.

शरद मोहोळच्या हत्येचा बदला घेण्यासाठी रचल्या गेलेल्या कटात आणखी आरोपींचा समावेश असण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तसेच या आरोपींनी कुणाला लक्ष केले होते, यात आणखी कोण सहभागी होते याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.

अशी झाली होती शरद मोहोळची हत्या

गँगस्टर शरद मोहोळचा दि. ५ जानेवारी २०२४ रोजी भरदुपारी कोथरूड परिसरातील सुतारदरा येथील घरासमोर गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. शरद मोहोळ याच्यासोबत कार्यरत असलेल्या साहिल उर्फ मुन्ना पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी हा खून केला होता. या प्रकरणात सतरा आरोपींचा समावेश असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!