BARAMATI MIDC : औद्योगिक ग्राहकांच्या वीजपुरवठ्यासंदर्भातील प्रश्न प्राधान्याने सोडवणार; मुख्य अभियंता धर्मराज पेठकर यांची ग्वाही

बारामती : न्यूज कट्टा  

बारामती एमआयडीसी, पणदरे एमआयडीसी, बारामती सहकारी औद्योगिक वसाहतीसह परिसरातील औद्योगिक ग्राहकांचे वीज पुरवठ्यासंबंधी प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्राधान्य देणार असल्याची ग्वाही महावितरणच्या  बारामती परिमंडळाचे नवनियुक्त मुख्य अभियंता धर्मराज पेठकर यांनी दिली.

मुख्य अभियंता पदाचा कार्यभार पेठकर यांनी नुकताच स्वीकारला. या पार्श्वभूमीवर बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार, सचिव अनंत अवचट, सदस्य महादेव गायकवाड, संभाजी माने व हरिश्चंद्र खाडे यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

बारामती एमआयडीसीतील  ट्रान्सफॉर्मर पंधरा ते वीस वर्षापूर्वी बसवलेले असून त्यातील बहुसंख्येने ओव्हरलोड झाले आहेत. त्यामुळे उद्योगांनी नवीन अथवा वाढीव वीजपुरवठा मागितला तर लोड शिल्लक नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे उद्योग वाढीवर विपरीत परिणाम होत असून महावितरणचा महसूल बुडत आहे. यासाठी महावितरणने संपूर्ण औद्योगिक क्षेत्रातील सर्व ट्रान्सफॉर्मर्सचे सर्वेक्षण करावे व उद्योगांची वाढीव वीज पुरवठ्या बाबतची मागणी विचारात घेऊन महावितरणच्या खर्चाने आवश्यक तेथे मोठ्या क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर्स बसवावेत. तसेच पणदरे एमआयडीसीमधील उद्योगांच्या वीज पुरवठ्याबाबत प्रदीर्घ काळापासून अनेक तक्रारी असून त्यासाठी ढाकाळे येथील मंजूर वीज उपकेंद्र तातडीने कार्यान्वित करावे व पणदरे मधील उद्योजकांना दिलासा द्यावा अशी आग्रही मागणी अध्यक्ष धनंजय जामदार यांनी यावेळी केली.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!