SHOCKING NEWS : मूलबाळ होईना अन् नोकरीही गेली.. वैफल्यग्रस्त दांपत्याने लग्नाच्या वाढदिवशी व्हाटसअप स्टेटस ठेवत केली आत्महत्या

नागपूर : न्यूज कट्टा    

लग्नाला कित्येक वर्ष होऊनही मूल होत नसल्यामुळं आणि कोरोनानंतर नोकरी गेल्यामुळे निर्माण झालेल्या वैफल्यातून दांपत्याने व्हाटसअप स्टेटस ठेवत लग्नाच्या वाढदिवशी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. नागपूरमधील जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मार्टिननगर येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. या दांपत्याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

जारील ऊर्फ टोनी ऑस्कर मॉनक्रिप (५४) आणि पत्नी अॅनी जारील मॉनक्रिप (४५) अशी आत्महत्या केलेल्या दाम्पत्याची नावे आहेत. याबाबत माहिती अशी की, टोनी आणि अॅनी यांनी प्रेमविवाह केला होता. दोघांचाही संसार अतिशय सुखात सुरू होता. मात्र गेले कित्येक वर्षात त्यांना अपत्य सुख लाभत नव्हते. त्यातून ते दोघेही नाराज होते. मात्र दोघेही एकमेकांना आधार देत आपला संसार पुढे चालवत होते.

दरम्यानच्या काळात कोरोनानंतर टोनी यांची नोकरी गेली. गेली दोन वर्षांपासून नोकरी नसल्यामुळे हे दोघेही पती-पत्नी निराश होते. मागील दोन महिन्यांपासून त्यांच्या निराशेत वाढ झाली होती. विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या ख्रिसमस सणावेळीही त्यांच्यात उत्साह दिसत नव्हता. मागील दोन महिन्यांपासून ते आत्महत्येच्या विचारात होते. अशातच त्यांनी आपल्या लग्नाच्या वाढदिवशी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.

आत्महत्येपूर्वी त्यांनी दिवसभर जेवण करणं टाळलं. सोमवारी रात्री त्यांनी आपल्या नातेवाईकांना फोन करून विचारपूसही केली. दरम्यानच्या काळात त्यांनी एक व्हिडिओ बनवून तो व्हाटसअप स्टेटसला ठेवला आणि मध्यरात्री लग्नाचा पोशाख घालून गळफास घेत आत्महत्या केली. आज सकाळी उशीरापर्यंत हे दोघे पती-पत्नी उठले नाहीत, ही बाब शेजाऱ्यांच्या लक्षात आली. त्यांनी या दोघांना आवाज देण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने खिडकीतून डोकावून पाहिल्यानंतर हे दोघेही गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळून आले. याबाबत जरीपटका पोलिस अधिक तपास करीत आहेत.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!