बारामती : न्यूज कट्टा
बारामती येथील कृषि विज्ञान केंद्राच्या वतीने दि. १६ ते २० जानेवारी या दरम्यान कृषिक प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन १५ जानेवारी रोजी ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत होणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजितदादा हे एकाच व्यासपीठावर आल्याचं पाहायला मिळणार आहे.
गेल्या दहा वर्षांपासून कृषिक हे प्रात्यक्षिक आधारीत कृषी प्रदर्शन आयोजित केले जात आहे. आज याबाबत संस्थेचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी पत्रकार परिषद घेत या प्रदर्शनातील वैशिष्ट्य आणि उदघाटन कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. यंदा होणारे कृषी प्रदर्शन हे कृत्रिम बुद्धिमत्ता संकल्पनेवर आधारीत आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन बुधवार दि. १५ जानेवारी रोजी होणार आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, पशुसंवर्धन मंत्री पांकजा मुंडे आणि क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचे उदघाटन होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीतील नेते एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे बारामतीत येत्या बुधवारी होऊ घातलेल्या या कार्यक्रमाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.





