PUNE BREAKING : चारित्र्याचा संशय आणि कौटुंबिक वादातून त्यानं कात्रीनं वार करत पत्नीला संपवलं; नंतर व्हिडिओ बनवत म्हणाला, लक्ष्मी होती ती..

पुणे : न्यूज कट्टा

चारित्र्याच्या संशयावरून पतीनं आपल्या मुलासमोरच कात्रीनं वार करत पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. विशेष म्हणजे, या माथेफिरुने खूनानंतर व्हिडिओ काढून तो आपल्या सहकाऱ्यांना पाठवल्याचंही समोर आलं आहे. या प्रकरणी खराडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.

ज्योती शिवदास गिते (वय २८, रा. तुळजाभवानीनगर, खराडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या खूनप्रकरणी या महिलेचा पती शिवदास तुकाराम गिते (वय ३७) याला अटक करण्यात आली आहे. बुधवारी दि. २२ जानेवारी रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास ही घटना घडली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिवदास गिते हा मूळचा बीडचा रहिवासी आहे. तो पुण्यातील न्यायालयात टंकलेखक म्हणून काम करत होता. आपल्या पत्नीसह खराडी परिसरातील तुळजाभवानीनगर येथे तो राहत होता.

मागील काही दिवसांपासून गिते दांपत्यांमध्ये कौटुंबिक कारणातून वाद सुरू होते. बुधवारी पहाटे शिवदास हा पाणी पिण्यासाठी उठला. त्यावेळी त्याची पत्नी ज्योती हिलाही जाग आली. याच दरम्यान या दोघांमध्ये पुन्हा वाद झाले. त्यानंतर शिवदासने घरातील शिलाईसाठी वापरल्या जाणाऱ्या कात्रीने पत्नी ज्योतीच्या गळ्यावर वार केले. हा सर्व प्रकार घडल्यानंतर त्यानं पत्नीच्या मृतदेहासह खूनाची माहिती देणारा व्हिडिओ शूट केला. तसेच तो व्हिडिओ काही सहकाऱ्यांना पाठवला. त्यानंतर त्यानं पोलिस ठाण्यात जाऊन या खूनाची माहिती दिली.

दरम्यान, शिवदासने स्वत:च्या संरक्षणासाठी पत्नीचा खून केल्याचं व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. ती माझ्या घराची लक्ष्मी होती. मला तिला मारण्याची इच्छा नव्हती. मांजयया मुलाला तिने जन्म दिला आहे. मात्र तिचे भाऊ वाढीव आहेत. त्यांनी मला मारण्याचा प्लॅन केला होता. तसेच मला मारण्याचा प्रयत्नही केला होता. त्यामुळं मला तिचा खून करावा लागला असं त्यानं व्हिडिओत सांगितलं आहे. शिवदासने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्याच्या पत्नीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दिसत आहे. तसेच त्याच्या समोरच्या बाजुला त्यांचा लहान मुलगा बसलेला दिसत आहे.

या कारणातून सुरू होते वाद

आरोपी शिवदास हा २०२१ मध्ये न्यायालयात नोकरीला लागला होता. तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्याने स्टेनोची परीक्षा दिली. मात्र तो नापास झाला. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने सहा महिन्यांनंतर पुन्हा परीक्षा घेण्याचे आणि तोपर्यंत त्याला कामावरून न काढण्याचे आदेश दिले होते. त्यातूनच त्याची पत्नी ज्योती ही त्याला अभ्यास करण्यासाठी सांगत होती. तीदेखील घरकाम करत कुटुंबाला हातभार लावत होती. यातूनच या दोघांमध्ये वाद झाल्याचं पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी सांगितलं.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!