SHOCKING : त्यानं फोन करून मित्रांना बोलवलं अन् टाटा..बाय-बाय म्हणत उचललं टोकाचं पाऊल; पंढरपूरमधील खळबळजनक घटना

पंढरपूर : न्यूज कट्टा  

त्यानं आपल्या मित्रांना फोन केला.. त्यांना बोलावून घेतलं आणि त्यांना भेटल्यानंतर टाटा.. बाय-बाय म्हणत थेट तलावात उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली. ही धक्कादायक घटना पंढरपूर शहरात घडली आहे. एका युवकानं येथील यमाई तलावात उडी घेत आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर पंढरपूर शहरात एकच खळबळ उडाली आहे.

ऋतिक शंकर कदम (वय २३) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. ऋतिक हा पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात हंगामी कर्मचारी म्हणून कार्यरत होता. बुधवारी रात्री तो शहरातील यमाई तलाव परिसरात गेला होता. त्यानं आपल्या मित्रांनाही भेटण्यासाठी बोलावून घेतलं होतं. मित्र आल्यानंतर ऋतिकने त्यांच्याशी काहीही संवाद न साधता टाटा.. बाय-बाय म्हणत तलावात उडी मारली.

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे त्याच्या मित्रांना धक्काच बसला. त्यांनी तात्काळ ऋतिकच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती दिली. तसेच पोलिसांनाही याबाबत कळवले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत रात्री उशीरापर्यंत ऋतिकचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात यश आले नाही. आज सकाळी पुन्हा शोधमोहीम राबवण्यात आली. त्यावेळी ऋतिकचा मृतदेह सापडला.

दरम्यान, ऋतिकने आत्महत्या का केली, याबद्दल अद्यापही कारण समोर आलेले नाही. या प्रकरणी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत. या घटनेनंतर पंढरपूर शहरात एकच खळबळ उडाली आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!