BARAMATI BREAKING : बारामती शहरातील रुई येथील पेट्रोलपंपावर मारहाणीची घटना; एकावर कोयत्याने वार

बारामती : न्यूज कट्टा

बारामती शहरातील रुई येथील खरेदी विक्री संघाच्या पेट्रोलपंपानजीक मारहाणीचा प्रकार घडला आहे. पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या एकाला काहींनी मारहाण करत बाहेर आणून त्याच्यावर कोयत्याने वार केल्याची घटना आज सायंकाळी घडली आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

बारामती एमआयडीसीत असलेल्या बारामती खरेदी विक्री संघाच्या पेट्रोलपंपावर एकजण पेट्रोल भरण्यासाठी आला होता. त्यावेळी काहीजण त्या ठिकाणी आले आणि त्यांनी संबंधित व्यक्तीला मारहाण करण्यास सुरुवात केली. या व्यक्तीला मारहाण करत पेट्रोलपंपाबाहेर आणून त्याच्यावर कोयत्याने वार केल्याची माहिती मिळत आहे.

आज संध्याकाळी हा प्रकार घडला असून या अद्याप याबाबत गुन्हा दाखल झालेला नाही. दरम्यान, व्यवहारातून हा प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे.

DETAILS AWAITED.. लवकरच ही बातमी सविस्तर प्रकाशित होईल. 

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!