SHOCKING NEWS : अकॅडमीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची परीक्षेपूर्वीच आत्महत्या; बारावी परीक्षेच्या पूर्वसंध्येलाच संपवलं जीवन..!

मिरज : न्यूज कट्टा

खासगी अकॅडमीत शिकणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्याने परीक्षेपूर्वीच राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मिरज शहरातील भारतनगर परिसरात घडली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून परीक्षेच्या तणावातून त्यानं हे टोकाचं पाऊल उचलल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रथमेश बाळासाहेब बिराजदार (वय १८) असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. प्रथमेश आपल्या कुटुंबियांसह भारतनगर येथे वास्तव्यास होता. मंगळवारी दि. ११ फेब्रुवारीपासून त्याची बारावीची परीक्षा सुरू होणार होती. तो एका खासगी अकॅडमीमध्ये बारावीचं शिक्षण घेत होता. सोमवारी तो अकॅडमीमध्ये गेला. त्या ठिकाणी परीक्षेच्या पूर्वतयारीबद्दल माहिती देण्यात आली. तसेच परीक्षेला कशा पद्धतीने सामोरे जावं याबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं.

अकॅडमीमधून तो रात्री ८ वाजता घरी परतला. त्यानंतर अभ्यासासाठी वरच्या मजल्यावर असलेल्या खोलीत गेला. त्या ठिकाणी त्यानं लोखंडी अॅंगलला गळफास घेत आपलं जीवन संपवलं. रात्री ९ वाजता त्याला जेवण्यासाठी हाक मारली असता त्यानं काहीच उत्तर दिलं नाही. त्यामुळं त्याच्या कुटुंबियांनी त्याच्या खोलीत जाऊन पाहणी केल्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आलं. हे दृश्य पाहून त्याच्या कुटुंबियांना जबर धक्का बसला.

दरम्यान, प्रथमेशचे वडील मिरज कृषी सहायक म्हणून कार्यरत आहेत. प्रथमेश अभ्यासात हुशार होता. मात्र बारावीची परीक्षा तोंडावर असल्यामुळे तो तणावात होता. त्यातूनच त्यानं आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणी मिरज येथील महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!