BARAMATI BREAKING : आर्थिक वादातून युवकाचा धारदार शस्त्राने वार करत खून; बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथील घटना

बारामती : न्यूज कट्टा  

पैशांच्या देवाणघेवाणीवरून झालेल्या वादातून एका २७ वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथे घडली आहे. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

रोहित गाडेकर (वय २७, रा. मासाळवस्ती, सोरटेवाडी) असं खून झालेल्या युवकाचं नाव आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, रोहित याचा आर्थिक देवाणघेवाणीतून सोरटेवाडी येथीलच माने (पूर्ण नाव समजले) नामक व्यक्तीशी वाद होता. त्यातूनच काल रात्री सोरटेवाडी येथील कुलकर्णी चारी येथे आरोपीने रोहित गाडेकर याच्या छातीवर आणि मानेवर धारदार शस्त्राने वार केले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या रोहितचा मृत्यू झाला आहे.

या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास करंजेपूल पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक राहुल साबळे हे करीत आहेत. दरम्यान, सोरटेवाडीत घडलेल्या या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!