बारामती : न्यूज कट्टा
उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या रविवार दि. १३ एप्रिल रोजी बारामतीच्या दौऱ्यावर येत आहेत. सकाळी सहा वाजल्यापासून ते बारामती शहर आणि परिसरातील विविध विकास कामांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सकाळी साडेअकरा वाजता सहयोग निवासस्थानी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उद्या बारामती दौरा आयोजित करण्यात आलेला आहे. सकाळी ६ वाजता ते बारामती शहर आणि परिसरातील विकास कामांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सकाळी १० वाजता कऱ्हावागज येथील शिवकृपा व्हेज या हॉटेलचं उदघाटन अजितदादांच्या हस्ते होणार आहे. सकाळी १०.३० वाजता बारामती पंचायत समिती येथे रत्ननिधी ट्रस्टच्या सहकार्यातून विद्यार्थ्यांना चष्मे आणि पुस्तक वाटप कार्यक्रम होईल.
सकाळी ११.३० वाजता सहयोग निवासस्थानी अजित दादांच्या उपस्थितीत जनता दरबार होणार आहे. या जनता दरबारात अजितदादा उपस्थित नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत सूचना देतील. गेल्या अनेक वर्षांपासून अजितदादांच्या उपस्थितीत जनता दरबाराचा आयोजन केले जाते. यामध्ये अजितदादा नागरिकांच्या अडचणींवर तात्काळ तोडगा काढतात. त्यामुळे या जनता दरबाराला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.
दुपारी ४.३० वाजता भिगवण रस्त्यावरील पुना फॅशन मॉल या दुकानाचं उदघाटन अजितदादांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर अजितदादा पुढील दौऱ्यासाठी रवाना होतील.





