छत्रपती साखर कारखान्याच्या इच्छुकांच्या गुरुवारी मुलाखती; बारामतीत ‘या’ ठिकाणी अजितदादांच्या उपस्थितीत होणार मुलाखती

बारामती : न्यूज कट्टा

छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी गुरुवार दि. २४ एप्रिल रोजी मुलाखती घेतल्या जाणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे हे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत. बारामतीतील इम्पिरीयल बॅन्क्वेट हॉलमध्ये या मुलाखती आयोजित करण्यात आल्याची माहिती पृथ्वीराज जाचक आणि किरण गुजर यांनी दिली आहे.

छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक तब्बल दहा वर्षांनंतर होत आहे. या पार्श्वभूमीवर चारशेहून अधिक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभासदांना साद घातली असून पुढील पाच वर्षे कारखान्याची सूत्रे पृथ्वीराज जाचक यांच्याकडे सोपवण्याची घोषणा केली आहे. अशातच राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार गटानेही अजितदादांच्या या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.

छत्रपती सहकारी साखर कारखाना सध्या अडचणीत असून येणाऱ्या पाच वर्षात सक्षम संचालक मंडळ नेमून हा कारखाना उर्जितावस्थेत आणण्याचा अजितदादांचा मानस आहे. त्यामुळं कारखान्याच्या संचालक मंडळात अभ्यासू उमेदवारांची निवड करण्यावर अजितदादांचा भर असणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर गुरुवार दि. २४ एप्रिल रोजी अजितदादा आणि क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे हे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत.

बारामती येथील इम्पिरीयल बॅन्क्वेट हॉलमध्ये या मुलाखती सकाळी ९ वाजता सुरू होणार आहेत. गटनिहाय या मुलाखती होणार आहेत. यामध्ये सकाळी ९ ते १० या वेळेत गुणवडी गट, सकाळी १० ते ११ सोनगाव गट, सकाळी ११ ते १२ लासुर्णे गट, दुपारी १२ ते १ या वेळेत सणसर, दुपारी २ ते ३ या वेळेत उद्धट आणि दुपारी ३ ते ४ या वेळेत अंथुर्णे गटातील इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत. या मुलाखतीसाठी इच्छुकांनी दिलेल्या वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन पृथ्वीराज जाचक आणि किरण गुजर यांनी केले आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!