मुंबईतील जैन मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ उद्या बारामती बंद; जैन समाजाकडून मोर्चाचंही आयोजन

बारामती : न्यूज कट्टा

मुंबईतील विलेपार्ले येथील ३५ वर्षे जुने जैन मंदिर पाडून येथील मूर्तींची विटंबना केल्याच्या निषेधार्थ उद्या गुरुवार दि. २४ एप्रिल रोजी बारामती बंद पुकारण्यात आला आहे. या बंदला बारामतीतील व्यापारी संघटनांनी पाठिंबा दर्शवला असून दुपारी १२ वाजेपर्यंत हा बंद पाळला जाणार आहे. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ सकाळी ८.३० वाजता जैन समाजाच्या वतीने मोर्चाही काढण्यात येणार आहे.

मुंबईतील विलेपार्ले येथे असलेले जैन मंदिर महानगरपालिकेकडून पाडण्यात आले आहे. हे मंदिर पाडताना येथील मूर्तींची आणि जैन शास्त्रांची विटंबना करण्यात आली. त्यामुळं राज्यातील जैन समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उद्या गुरुवार दि. २४ एप्रिल रोजी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. यामध्ये बारामतीकरही सहभागी होणार आहेत.

उद्या बारामतीतील बाजारपेठ दुपारी १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. या बंदला बारामतीतील व्यापारी संघटनांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर सकाळी ८.३० वाजता जैन समाजाच्या वतीने निषेध मोर्चाही काढण्यात येणार आहे. महावीर पथ येथील श्री मुनीसुव्रत दिगंबर जैन मंदिरापासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. यामध्ये सर्व धर्मियांनी सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!