बारामतीतील मुस्लिम बँकेच्या शाखेच्या स्थलांतराचा घाट; भाडोत्री जागेत स्थलांतराला सभासद, खातेदारांचा तीव्र विरोध

बारामती : न्यूज कट्टा

मुस्लिम सहकारी बँकेच्या बारामती येथील शाखा स्वामालकीच्या इमारतीतून भाडोत्री इमारतीमध्ये स्थलांतरीत करण्याच्या हालचाली सुरू आहेत. बँकेच्या मालकीची इमारत असताना शाखा इतरत्र हलवण्याचा घाट कशासाठी असा सवाल उपस्थित करता बँकेच्या सभासद आणि खातेदारांनी स्थलांतराला तीव्र विरोध दर्शवला आहे. तसे पत्रही बँकेच्या व्यवस्थापनाला देण्यात आले आहे.

मुस्लिम सहकारी बँकेची बारामती शहरातील सिनेमा रोडवर स्वामालकीच्या इमारतीत शाखा सुरू आहे. या शाखेतूनच आजवर बँकेचे कामकाज केले जात आहे. शहरात मध्यवर्ती भागात ही शाखा असल्यामुळे सभासद, खातेदारांना ये-जा करणे सोईस्कर होते. मात्र आता ही शाखा अन्यत्र हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. स्वामालकीच्या इमारतीतून ही शाखा भाडोत्री जागेत नेण्याचा घाट घालण्यात आला आहे.

बँकेला स्वत:ची इमारत असताना भाडोत्री जागेत स्थलांतर करण्याचं कारण काय असा सवाल सभासद आणि खातेदारांकडून उपस्थित केला जात आहे. वास्तविक आहे त्याच ठिकाणी बँकेच्या व्यवसायात वाढ होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. असं असताना नाहक भाडोत्री इमारतीत शाखा हलवून बँकेचे नुकसान कशासाठी करायचे असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

याबाबत बँकेच्या सभासद आणि खातेदारांकडून व्यवस्थापनाला लेखी निवेदन देण्यात आले आहे. या शाखेचे स्थलांतर करण्यास तीव्र विरोध दर्शवत आला आहे. त्यामुळे आता व्यवस्थापन मंडळाकडून बँकेच्या हिताचा विचार केला जाणार का याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!