PUNE CRIME : अनैतिक संबंधाला विरोध अन् वादावादी; विरोध करणाऱ्या इस्टेट एजंटचा थेट गेम, पुण्यातील घटनेत दोघांना अटक

पुणे : न्यूज कट्टा  

मेहुणीच्या अनैतिक संबंधाला विरोध करणाऱ्या एका इस्टेट एजंटचा बांबूने मारहाण करत खून केल्याची घटना पुण्यात घडली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

मनोहर दिनकर शिंदे (वय ४६, रा. पवारनगर, मांगडेवाडी, कात्रज) असं या घटनेतील मृत पावलेल्या इस्टेट एजेंटचं नाव आहे. या प्रकरणी रोहित उर्फ बुधाजी मारुती असोरे (वय ३२) आणि केशव मोतीराम असोरे (वय २६, दोघेही रा. खोपडेनगर, निंबाळकरवाडी) या दोघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी की, मनोहर शिंदे याच्या मेहुणीचे आरोपी रोहित याच्याबरोबर अनैतिक संबंध होते. याला मनोहर शिंदे यांचा विरोध होता. त्यातूनच त्यांच्यात सातत्याने वाद होत होते.

शुक्रवारी रात्री रोहितने गुजरवाडी रस्त्यावर पवारनगर येथे आपल्या साथीदारांसह मनोहरला गाठले आणि त्या ठिकाणी बांबूने, लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यामध्ये डोक्याला जबर मार लागल्याने मनोहर याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत तपासाला सुरुवात केली.

या घटनेतील आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी दोन पथके पाठवली होती. मुख्य आरोपी रोहित याला पुण्यातून तर केशव याला बीड जिल्ह्यातील गेवराई येथून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास भारती विद्यापीठ पोलिस करत आहेत.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!