पुणे : न्यूज कट्टा
पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी पुणे शहर पोलिस दलातील उपायुक्त संदीपसिंह गिल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पंकज देशमुख यांची पदोन्नतीने बदली करण्यात आली असून त्यांना पुणे शहर पोलिस दलात अतिरिक्त पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती मिळाली आहे.
संदीपसिंह गिल हे सध्या पुणे शहर पोलिस दलात उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी सिंघम अधिकारी म्हणून आपला दबदबा निर्माण केला असून गणेशोत्सव काळातही उल्लेखनीय काम केले आहे. तसेच कोयता गँगचा बंदोबस्त करण्यातही गिल यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. संदीपसिंह गिल हे आता पुणे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारतील.
सध्याचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांची पदोन्नती झाली असून त्यांना पुणे शहर पोलिस दलात अतिरिक्त पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Post Views: 1,417





