BIG NEWS : माळेगाव कारखान्याच्या निवडणुक रणधुमाळीला सुरुवात; उद्या अजितदादांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा

बारामती : न्यूज कट्टा

माळेगाव सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुक नुकतीच जाहिर झाली आहे. या पार्श्वभूमीवर उद्या गुरुवार दि. २२ मे रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्यात अजितदादांकडून माळेगावच्या निवडणुकीबाबत भुमिका स्पष्ट केली जाणार आहे. त्यामुळं या मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. या पार्श्वभूमीवर उद्या गुरुवारी दि. २२ मे रोजी सकाळी १०.३० वाजता अजितदादांच्या उपस्थितीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे यांनी दिली.

बारामती शहरातील कसबा येथील राष्ट्रवादी भवनामध्ये हा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यात माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीबाबत भुमिका स्पष्ट करुन अजितदादा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे या मेळाव्याकडे सर्वांचे विशेषत: माळेगाव कारखान्यासाठी इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजितदादांच्या नेतृत्वाखालील पॅनलनं दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत अजितदादांनी छत्रपतीच्या हितासाठी सर्व विरोधकांना एकत्र आणले. त्यामुळं आता माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत अजितदादा काय भुमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!