BARAMATI NEWS : बातमी ज्येष्ठ नागरिकांसाठी; अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीत होणार मोफत गुडघा प्रत्यारोपण शिबिर

बारामती : न्यूज कट्टा

उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या ६७ व्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय बारामती येथे  ४ जून आणि ७,८ व १६ जुलै २०२५ रोजी मोफत गुडघा प्रत्यारोपण शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.

पुणे येथील वॉक फाऊंडेशन आणि बायोरॅड मेडिसिस या स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबीरात मोफत तपासणी करण्यासोबतच रुग्णांवर कोणताही खर्च न करता संपूर्ण उपचार करण्यात येणार आहेत. मुंबई, पुणे आणि कोल्हापूर येथील अनुभवी आणि गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत पारंगत सर्जन्सद्वारे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे गुडघ्याचे सांधे आणि रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करून शस्त्रक्रिया अधिक अचूक आणि यशस्वीपणे करण्याचे नियोजन आहे. पुणे जिल्ह्यासोबतच बाहेरील रुग्णांसाठीही ही सुविधा उपलब्ध आहे. शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना प्रशिक्षकाकडून मार्गदर्शन आणि एक वर्ष नियमित चाचणी सुविधा मिळणार आहे.

या शिबीरात विशेषतः संधिवातामुळे त्रस्त ज्येष्ठ नागरिक, चालताना तीव्र वेदना किंवा चालणे अशक्य झालेल्या रुग्णसोबतच आर्थिक परिस्थितीमुळे शस्त्रक्रिया करणे शक्य नसलेल्या रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा. या शिबीरात सहभागी होण्याकरीता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय येथे लवकरात लवकर नोंदणी करुन या संधीचा लाभ घ्यावा, आपल्या जवळच्या नातेवाईंकांनाही या शिबिराबाबत माहिती द्यावी, असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!