बारामती : न्यूज कट्टा
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या सोमवार दि. २ जून रोजी बारामती दौऱ्यावर येत आहेत. सकाळी बारामती शहरातील राष्ट्रवादी भवनात ते माळेगावच्या कार्यक्षेत्रातील इच्छुक उमेदवारांच्या भेटी घेणार आहेत.
माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी २२ जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. माळेगावसाठी तब्बल ५०० अर्ज दाखल असून अर्ज माघारी घेण्याची मुदत १२ जूनपर्यंत असून दि. १३ जून रोजी अंतिम उमेदवार यादी जाहिर होईल. त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीत किती पॅनल होतात याकडेही सभासदांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या सोमवार दि. २ जून रोजी बारामती दौऱ्यावर येत आहेत. सकाळी ९ वाजता ते राष्ट्रवादी भवनात माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील गटनिहाय इच्छुक उमेदवारांच्या भेटी घेत त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे यांनी ही माहिती दिली.
माळेगाव कारखान्यावर अजितदादांचं वर्चस्व आहे. राज्यात सर्वाधिक दर देणारा कारखाना म्हणून माळेगावची ओळख आहे. येणाऱ्या काळात केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून माळेगाव कारखान्याची अधिकची प्रगती व्हावी यावर अजितदादांचा भर असणार आहे. त्यामुळंच त्यांनी ही निवडणुक गांभीर्यानं घेत रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे.





