बारामती : न्यूज कट्टा
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी श्री निळकंठेश्वर पॅनलने उमेदवारांची यादी जाहिर केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुचनेनुसार ही यादी जाहिर करण्यात आली आहे. यात अनेक विद्यमान संचालकांचा समावेश असून काही नविन चेहरेही समाविष्ट करण्यात आले आहेत.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दि. २२ जून रोजी मतदान होत आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत श्री निळकंठेश्वर पॅनलने आपल्या उमेदवारांची यादी जाहिर केली. कसबा येथील राष्ट्रवादी भवनामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ही यादी जाहिर करण्यात आली.

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे, माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष केशवराव जगताप, जिल्हा बॅंकेचे संचालक संभाजी होळकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष रविंद्र माने हे यावेळी उपस्थित होते. दरम्यान, माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीसाठी स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ब वर्गातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तो कायम ठेवला असून अजितदादा स्वत: निवडणुक रिंगणात उतरल्यामुळे ही निवडणुक चुरशीची होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
श्री निळकंठेश्वर पॅनलची उमेदवार यादी :
गट क्र. १ माळेगाव : बाळासाहेब पाटील तावरे, शिवराज प्रतापसिंह जाधवराव, राजेंद्र सखाराम बुरुंगले
गट क्र. २ : पणदरे : तानाजी तात्यासो कोकरे, स्वप्निल शिवाजीराव जगताप, योगेश धनसिंग जगताप
गट क्र. ३ : सांगवी : विजय श्रीरंग तावरे, विरेंद्र अरविंद तावरे, गणपत चंदरराव खलाटे
गट क्र. ४ : खांडज-शिरवली : प्रताप जयसिंग आटोळे, सतीश जयसिंग फाळके
गट क्र. ५ : निरावागज : जयपाल निवृत्ती देवकाते, अविनाश गुलाबराव देवकाते
गट क्र. ६ : बारामती : नितीन सदाशिव सातव, देवीदास सोमनाथ गावडे
ब वर्ग : अजित अनंतराव पवार
अनुसुचित जाती जमाती प्रवर्ग : रतन साहेबराव भोसले
महिला राखीव : संगीता बाळासाहेब कोकरे, ज्योती मच्छिंद्रनाथ मुलमुले
इतर मागास प्रवर्ग : नितीन वामनराव शेंडे
भटक्या विमुक्त जाती जमाती : विलास ऋषिकांत देवकाते





