बारामती : न्यूज कट्टा
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे आणि रंजनकुमार तावरे या गुरु-शिष्यांच्या जोडीकडून सहकार बचाव शेतकरी पॅनलची घोषणा करत उमेदवारांची यादी आज जाहीर केली. या पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ उद्या शुक्रवार दि. १३ जून रोजी केला जाणार आहे.
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज सकाळी राष्ट्रवादी कॉँग्रेस पुरस्कृत श्री निळकंठेश्वर पॅनलची यादी जाहीर करण्यात आली. त्यानंतर शरद पवार गटाकडून बळीराजा शेतकरी पॅनलच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली. सायंकाळी चंद्रराव तावरे आणि रंजनकुमार तावरे यांनी पत्रकार परिषद घेत सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली.
चुकीच्या धोरणांमुळे माळेगाव सहकारी कारखान्याचे मागील पाच वर्षात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याचा फटका सभासदांना बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर देतानाच कारखान्याची अधिकची प्रगती करण्यासाठी म्हणून आम्ही या निवडणुकीला सामोरे जात असल्याचं चंद्रराव तावरे यांनी यावेळी जाहीर केलं. तसेच संभासदांचा अण्णा-काका जोडीवर विश्वास असल्यामुळे ते या निवडणुकीत आमच्या पॅनलच्या उमेदवारांनाच निवडून देतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सहकार बचाव शेतकरी पॅनलचे उमेदवार :
गट क्र. १ : माळेगाव : रंजनकुमार शंकरराव तावरे, संग्राम उर्फ गजानन शंकरराव काटे, रमेश शंकरराव गोफणे
गट क्र. २ : पणदरे : सत्यजित संभाजी जगताप, रणजीत शिवाजीराव जगताप, रोहन रवींद्र कोकरे
गट क्र. ३ सांगवी : चंद्रराव कृष्णराव तावरे, रणजीत वीरसेन खलाटे, संजय बाबुराव खलाटे
गट क्र. ४ : खांडज-शिरवली : मेघशाम विलास पोंदकुले, विलास नारायण सस्ते
गट क्र. ५ : निरावागज : राजेश सोपान देवकाते, केशव तात्यासो देवकाते
गट क्र. ६ : बारामती : गुलाबराव बाजीराव गावडे, वीरसिंह विजयसिंह गवारे
ब वर्ग : भालचंद्र बापूराव देवकाते
महिला राखीव : राजश्री बापूराव कोकरे, सुमन तुळशीराम गावडे
अनुसूचित जाती-जमाती : बापूराव आप्पा गायकवाड
इतर मागास प्रवर्ग : रामचंद्र कोंडीबा नाळे
भटक्या विमुक्त जाती जमाती : सूर्याजी तात्यासो देवकाते





