BIG NEWS : माळेगाव कारखाना निवडणूकीसाठी श्री निळकंठेश्वर पॅनलच्या प्रचाराचा उद्या शुभारंभ; अजितदादांच्या उपस्थितीत होणार सभा

बारामती : न्यूज कट्टा  

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी श्री निळकंठेश्वर पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ उद्या शनिवार दि. १४ जून रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. या निवडणुकीत ब वर्ग प्रवर्गातून अजितदादांनी आपली उमेदवारी कायम ठेवली असून उमेदवार म्हणून ते उद्या पहिल्यांदाच सभासदांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे या सभेकडे कार्यक्षेत्रासह सर्वांचेच लक्ष लागले आहे.

माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीसाठी २२ जून रोजी मतदान होणार आहे. काल राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे, माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष केशवराव जगताप, जिल्हा बँकेचे संचालक संभाजी होळकर यांनी श्री निळकंठेश्वर पॅनलच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये काही विद्यमान संचालक वगळता सर्वच नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ब वर्ग प्रवर्गातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उमेदवारी कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे.

निळकंठेश्वर पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ उद्या शनिवार दि. १४ जून रोजी दुपारी साडेतीन वाजता पाहुणेवाडी येथील ओमसाई लॉन्स येथे अजितदादांच्या उपस्थितीत होणार आहे. या सभेच्या निमित्ताने अजितदादा उमेदवार म्हणून पहिल्यांदाच माळेगावच्या सभासदांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे अजितदादा उद्या काय बोलतात याकडे संपूर्ण कार्यक्षेत्राचे लक्ष लागले आहे.

माळेगाव कारखान्याच्या हिताची जपणूक करण्यावर भर देणाऱ्या निळकंठेश्वर पॅनलच्या प्रचार शुभारंभ सभेला अधिकाधिक सभासद, कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे, प्रचारप्रमुख केशवराव जगताप, जिल्हा बँकेचे संचालक संभाजी होळकर, बाजार समितीचे माजी सभापती सुनील पवार यांनी केले आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!