Malegaon Breaking : माळेगाव कारखाना निवडणूक; निळकंठेश्वर पॅनलची विजयी सुरुवात, ब वर्गातून अजितदादांचा विजय

बारामती : न्यूज कट्टा      

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पहिल्याच निकालात निळकंठेश्वर पॅनलने विजयी सुरुवात केली आहे. ब वर्गातून अपेक्षेप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विजय मिळवला आहे. त्यांना या निवडणुकीत १०१ पैकी ९१ मते मिळाली आहेत.

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी रविवार दि. २२ जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत १७२९६ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. तर ब वर्गातील १०१ मतदारांनी मतदान केले होते. आज बारामती येथील प्रशासकीय भवनात मंतमोजणीला सुरुवात झाली. ब वर्गापासून मोजणीला सुरुवात करण्यात आली.

ब वर्गातून अजितदादांना ९१ इतकी मते मिळाली. तर भालचंद्र बापूराव देवकाते यांना १० मतांवर समाधान मानावे लागले. अपेक्षेनुसार अजितदादांनी ब वर्गातून विजय मिळवला आहे. आजच्या मतमोजणीत निळकंठेश्वर पॅनलची विजयी सुरुवात झाली असून पुढे काय निकाल लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!