बारामती : न्यूज कट्टा
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीने वेग घेतला असून ही मोजणी महिला राखीव प्रवर्गापर्यंत आली आहे. त्यामध्ये निळकंठेश्वर पॅनल आणि सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या महिला उमेदवार आघाडीवर आहेत. या गटात ‘टफ फाईट’ असल्याचं पाहायला मिळत असून या ठिकाणी ‘क्रॉस वोटिंग’ झाल्याचं समोर येत आहे.
माळेगाव साखर कारखाना निवडणुकीच्या मतमोजणीत आतापर्यंत अनुसूचित जाती जमाती प्रवर्गात रतनकुमार भोसले, इतर मागास प्रवर्गात नितीन शेंडे या दोघांची आघाडी कायम आहे. तर महिला राखीव गटात टफ फाईट होताना दिसत आहे. या गटात निळकंठेश्वर पॅनलच्या संगीता कोकरे आणि सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या राजश्री कोकरे या दोघी सध्या आघाडीवर आहेत. तर निळकंठेश्वर पॅनलच्या ज्योती मुलमुले या तिसऱ्या स्थानावर आहेत, तर सहकार बचावच्या सुमन गावडे या चौथ्या क्रमांकावर आहेत.
महिला राखीव गटामध्ये रंगतदार लढत पाहायला मिळत आहे. मात्र सध्या मोजणी सुरू असलेल्या गटानंतर हे चित्र बदलूही शकते. त्यामुळं ऐनवेळी या गटातील निकाल वेगळा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र या गटात मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग झाल्याचं या निमित्तानं पाहायला मिळत आहे. त्यामुळं या गटाचा निकाल काय लागतो याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.





