बारामती : न्यूज कट्टा
माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ब वर्गातून विजय झाला होता. त्यानंतर आज सकाळपासून दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली असून एक एक निकाल समोर येवू लागले आहेत. सध्या तिसरा निकाल जाहीर झाला असून इतर मागास प्रवर्गातून निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार नितीन शेंडे हे ११५३ मतांनी निवडून आले आहेत.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी काल दि. २४ जूनपासून बारामती येथील प्रशासकीय भवनात सुरू आहे. रात्री उशीरापर्यंत मतमोजणीची पहिली फेरी पार पडली असून त्यामध्ये अजितदादांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनलने आघाडी घेतली आहे. दरम्यान, काल ब वर्ग मतदारसंघाचा पहिला निकाल जाहीर करण्यात आला होता, त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ९१ मते मिळवत विजय मिळवला आहे.
त्यानंतर आज सकाळी दुसऱ्या फेरीची मतमोजणी सुरू झाली आहे. त्यामध्ये दूसरा निकाल हाती आला आहे. त्यानंतर आता तिसराही निकाल हाती आलेला आहे. इतर मागास प्रवर्गातून निळकंठेश्वर पॅनलचे नितीन शेंडे यांना ८४९४ मते मिळाली, तर सहकार बचाव पॅनलचे रामचंद्र नाळे यांना ७३४१ मते मिळाली आहेत. यामध्ये ११५३ मतांनी नितीन शेंडे यांचा विजय झाला आहे.





