BARAMATI CRIME : दुकानासमोरून ये-जा करण्यावरून वाद; बारामतीत चक्क वकिलानं व्यावसायिकाच्या छातीवर कात्रीनं केला वार

बारामती : न्यूज कट्टा    

दुकानासमोर ठेवलेल्या साहित्यामुळे ये-जा करण्यासाठी अडथळा होत असल्याचं सांगण्यासाठी गेलेल्या व्यावसायिकाला एका वकिलानं मारहाण केल्याची घटना बारामती शहरातील मारवाड पेठेत घडली आहे. विशेष म्हणजे या वकील महाशयांनी रागाच्या भरात कात्रीनं व्यावसायिकाच्या छातीवर वार केल्याचंही समोर आलं आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात संबंधित वकिलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहन भगवान बोराटे (रा. कसबा, बारामती) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मनोहर निवृत्ती डेंगळे (रा. गुणवडी, ता. बारामती) या वकिलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, मोहन बोराटे यांचा मुलगा प्रतीक आणि त्याचा मित्र श्रेयस ढवळे या दोघांचे मारवाड पेठेतील सक्सेस चेंबर्स येथे आर्किटेकचे ऑफिस आहे. या शेजारीच मनोहर डेंगळे यांचे दोन गाळे असून त्या समोरून ये-जा करण्यासाठी पॅसेज आहे.

या मोकळ्या पॅसेजमध्ये डेंगळे यांनी बंद पडलेली झेरॉक्स मशीन, बाकडे आणि खुर्च्या ठेवल्या होत्या. त्यामुळे शेजारी येणाऱ्या लोकांना ये-जा करण्यास अडथळा होत होता. त्यामुळं फिर्यादी व त्यांच्या मुलाने अनेकदा त्यांना साहित्य हलवण्याची विनंती केली होती. मात्र हे वकील त्यांनाच दमदाटी करत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यातूनच दि. ३० जून रोजी फिर्यादी हे मनोहर डेंगळे यांच्याकडे साहित्य उचलण्याबाबत बोलण्यासाठी गेले. मुलांवर हात का उचलला अशी विचारणा केल्यावरून त्यांच्यात वाद झाला.

त्यावर या वकिलाने थेट आपल्या हातातील कात्रीने फिर्यादी मोहन बोराटे यांच्या छातीवर दुखापत केली. एवढ्यावरच न थांबता तुला जीवे मारीन असं धमकावत शिवीगाळ केली. या घटनेनंतर मोहन बोराटे यांना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बारामती शहर पोलिसांनी मनोहर डेंगळे याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ११८ (२), ३५२, ३५१ (२), ३५१ (३) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

 

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!