बारामती : न्यूज कट्टा
शारदानगर येथील ॲग्रीकलचरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलीत कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्षाचे विद्यार्थी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमासाठी पणदरे येथे वास्तव्य करत आहेत. या दरम्यान त्यांनी अनोख्या पद्धतीने कृषी दिन साजरा केला. पणदरे येथे वृक्षारोपण करत या कृषी दिन साजरा केला.
कार्यानुभव कार्यक्रमानिमित्त कृषी दूत पणदरे येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्याकडून प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतीची माहिती घेण्यासह शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला. कृषी दिनानिमित्त या सर्वांनी पणदरे गावात वृक्षारोपण केलं. यावेळी पणदरे गावचे सरपंच अजय सोनवणे, उपसरपंच, सदस्य, जि.प.शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षकांसह शेतकरी आणि ग्रामस्थांनी उपस्थित राहत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कृषीप्रधान देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारत देशात कृषीसंस्कृतीचे स्मरण आणि शेतकरी कृतज्ञतेचे प्रतिक म्हणून १ जुलै रोजी कृषी दिन साजरा केला जातो. हा दिवस नैसर्गिकरित्याच पेरणीच्या मुहूर्तावर आलेला एक पावनपर्व आहे. महानायक वसंतराव नाईक यांनी हरितक्रांती व श्वेतक्रांती घडवून आणली. याशिवाय पंचायतराज व रोजगार हमी योजनाचे देखील वसंतराव नाईक हे शिल्पकार मानले जातात.
यावेळी कृषीदूत रिद्धीश पाटील,अनिकेत लकडे,वेद चौधरी,हर्षद गरुड,अमित नवले,तेजस शितोळे,अनुराग क्षीरसागर,शिवम जगताप,सुधांशु कुमावत आणि मुकुंद शेजवळ आदींनी वृक्षरोपण करीत ग्रामस्थांना पर्यावरणाचे महत्व पटवून दिले.





