BIG BREAKING : अजितदादांचा मोठा निर्णय; कृषी खात्याचा कारभार दत्तात्रय भरणे यांच्याकडे जाणार, तर क्रीडा खाते माणिकराव कोकाटे यांच्याकडे..!

मुंबई : न्यूज कट्टा

आपल्या वक्तव्यांसह विधानभवनात रम्मी खेळून वादग्रस्त ठरलेल्या माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषी खात्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. कृषी खात्याचा कारभार मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे दिला जाणार असून माणिकराव कोकाटे यांना क्रीडा खाते दिले जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

वादग्रस्त वक्तव्यांसह विधानभवनात रम्मी गेम खेळल्यामुळे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे चर्चेत आले होते. त्यांच्याविरोधात राज्यभर संताप व्यक्त करत राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची एक बैठक पार पडली. यामध्ये तूर्तास खातेबदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कृषी खात्याचा कारभार अजितदादांचे विश्वासू म्हणून ओळख असलेले इंदापूरचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच भरणे यांच्याकडील क्रीडा खात्याचा पदभार माणिकराव कोकाटे यांना दिला जाणार आहे. याबाबत अधिकृत घोषणा झालेली नसली तरी खाते बदलाबाबत पत्रही संबंधित यंत्रणांकडे देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, दत्तात्रय भरणे हे अजितदादांचे जवळचे सहकारी म्हणून ओळखले जातात. सलग तीनवेळा त्यांनी इंदापूरमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना भरणे यांना राज्यमंत्रीपदी संधी देण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर त्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून संधी देण्यात आली. यामध्ये क्रीडा आणि अल्पसंख्याक विकास खात्याचा पदभार दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आला होता.

 

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!