AJITDADA STYLE : वेळ सकाळी साडेसहाची,पण अजितदादा पोहोचले पावणेसहालाच; बीडमध्ये विकासकामांच्या पाहणीवेळी नेमकं काय घडलं..?

बीड : न्यूज कट्टा  

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बीडचा दौरा केला. नेहमीप्रमाणे त्यांनी भल्या पहाटेच आपल्या दौऱ्याची सुरुवात करत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. बीड शहरातील विविध कामांची पाहणी करण्यासाठी अजितदादांची सकाळी साडेसहा वाजताची वेळ निश्चित होती. मात्र अजितदादांनी पावणेसहा वाजताच आपल्या पाहणी दौऱ्याला सुरुवात केल्यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली.

कालपासून अजितदादा बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी विविध विभागांच्या बैठका घेत जिल्ह्यात सुरु असलेल्या कामांचा आढावा घेतला. त्यानंतर रात्री उशीरापर्यंत त्यांनी नागरिकांच्या भेटी घेत त्यांचे प्रश्न समजावून घेतले. नियोजित दौऱ्यानुसार त्यांचा आजचा पाहणी दौरा सकाळी साडेसहा वाजता सुरु होणार होता. मात्र अजितदादांनी नेहमीप्रमाणे सकाळी पावणेसहालाच आपला दौरा सुरु केला. त्यामुळे स्थानिक अधिकारी आणि प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.

सकाळी अजितदादांनी बीडच्या जिल्हा क्रीडा संकुलासह कंकालेश्वर मंदिर, जिल्हा रुग्णालयात सुरु असलेल्या आणि प्रस्तावित विकासकामांची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी दीर्घकाळ टिकणारी कामे करण्यावर भर देण्याच्या सुचना दिल्या. तसेच कोणत्याही कामासाठी निधीची कमतरता भासणार नसल्याचं स्पष्ट केलं. विकासकामे दर्जेदार होत असतानाच स्वच्छताही राहिली पाहिजे याकडेही लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

बीडकरांना भावली अजितदादांच्या कामाची स्टाईल

दरम्यान,  आज अजितदादांनी बीड शहरातील जिल्हा क्रीडा संकुलाला भेट दिली. यावेळी उपस्थित क्रीडाप्रेमींनी अजितदादांकडे विविध क्रीडा संकुलाबाबत विविध समस्या मांडायला सुरुवात केली. त्याचवेळी जिल्हाधिकाऱ्यांनी क्रीडा संकुलात होणाऱ्या प्रस्तावित कामांची यादीच वाचून दाखवली. अजितदादांनी बीडमध्ये येण्यापूर्वीच या कामांसाठी निधीही मंजूर केल्याचं सांगितलं. त्यावर उपस्थितांनी टाळ्या वाजवत अजितदादांच्या कामाच्या स्टाईलला दाद दिली.

[ays_poll cat_id=1]

हे देखील पहा...

error: Content is protected !!